कलम 144 म्हणजे काय ? - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Tuesday, 14 April 2020

कलम 144 म्हणजे काय ?


कलम 144 म्हणजे काय ? 

पुणे :- पुणे शहरातील बऱ्याच लोकांना कलम 144 चे महत्व माहीत नाही की कोरोना विषाणुला अटकाव करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोना विषाणु याला रोखण्यासाठी राज्य सरकारने कलम 144 अन्वये जमावबंदी लागू केली असताना देखील पुुणे शहरातील व काही परिसरातील नागरिकांचा सतत वावर दिसून येत आहे चौकातील तरुणांचे घोळके, धावत्या रिक्षा, विनाकारण दुचाकीवर भटकणारे तरुण हे नेहमीप्रमाणे आजही रस्त्यावर वावरताना दिसून येत आहेत. शहरात नागरिकांची गर्दी जर अशीच राहिली तर कोरोना विषाणूला रोखणे हाता बाहेर जाईल अशी भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. पुुने शहरात पोलिसांनी संचारबंदी देखील लागू केली आहे. तरीही काही ठिकाणी गर्दी दिसून येत आहे.
'कलम 144' म्हणजे काय…?
- सीआरपीसी अंतर्गत येणारे कलम 144 शांती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी लागू केली जाते.
- ५ किंवा जास्त लोकांनी एकत्र येण्यास निर्बंध आणले जातात… यालाच जमावबंदी अथवा कर्फ्यू असे म्हणतात.
- कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येतो.
- जमावबंदीचा आदेश लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तसेच जिल्हा न्यायदंडाधिकारी देत असतात.
- कलम 144 चे पालन न केल्यास पोलीस त्या व्यक्तीला अटक करू शकते.
- जमाव बंदीचे उल्लंघन करणाऱ्याला १ वर्षाची शिक्षा होऊ शकते.
- या आदेशाचा कालावधी हा २ महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये, कालावधी पूर्ण झाल्यावर पुन्हा जमावबंदी लागु केली जाऊ शकते.
परंतु अत्यावश्यक काळात जर राज्य सरकारला वाटले तर याची अंमलबजावणी सहा महिन्यापर्यंत सुद्धा लागू केली जाऊ शकते.

बातमी व जाहिरातींसाठी संपर्क
मुख्य संपादक मुज्जम्मील शेख
7507737313 / 7887776668

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages