अलफिया पटेल याने दिली वाढदिवसाची रक्कम कोरोना मदतनिधीला... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Wednesday, 15 April 2020

अलफिया पटेल याने दिली वाढदिवसाची रक्कम कोरोना मदतनिधीला...


अलफिया पटेल याने दिली वाढदिवसाची रक्कम कोरोना मदतनिधीला...

नवी मुंबई - नवी मुंबईतील खेरणे भागात राहणाऱ्या एका विध्यार्थीनेने आपल्या वाढदिवसाची रक्कम कोरोना महामारी विरोधात मदत कार्य म्हणून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे.या
विद्यार्थिनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अलिफिया असे या मुलीचे नाव असून ती खैरणे प्रभाग क्रमांक ५५ येथील नगरसेवक मुन्नवर पटेल आणि समाजसेविका नाजिया यांची मुलगी आहे.
लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या मानवतावादी विचारांनी प्रेरित होऊन हे दोघेही माजी आमदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा करीत आहेत. त्यांच्या अंगी असलेले हेच उदार विचार अलिफिया हिने प्रत्यक्ष कृतीत उतरवले आहेत. कोरोनाशी ताकदीने दोन हात करण्यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला मदतीसाठी अनेक हात पढे सरसावले आहेत.अलिफिया न सामाजिक बांधिलकी दाखवत यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करता वाढदिवसावर खर्च होणारी रक्कम कोरोना ग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. त्यानुसार पंतप्रधान केअर्स निधीसाठी अकरा हजार रुपये आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीसाठी पाच हजार रुपये योगदान दिले आहे.
या योगदानातून मिळालेले समाधान वाढदिवस साजरा करून मिळणार्‍या आनंदा पेक्षाही मोठे असल्याची भावना अलिफियाने व्यक्त केली आहे.
कोपर खैरने येथील रिलायन्स फाउंडेशनच्या कॉलेजमध्ये बारावीत अलिफिया शिकत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages