पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात.. - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Tuesday, 14 April 2020

पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात..

पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात...

Police-personnel-endangered

Times of Maharashtra  : कोरोना या विषाणुमुळे सर्व रस्ते व दुकाने बंद ठेवण्याचा निर्देश सरकारने दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी अक्षरशः कंबर कसली आहे.

कोरोना या विषाणुमुळे रस्त्यावर तैनात असलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी ह्यांना असुविधेचा सामना करावा लागत आहे.

 त्यामध्ये स्वयं रक्षणासाठी अपुर्ण सामग्री डोळ्यांचे चष्मे, हँड ग्लोझ, सॅनिटायजर, मास्क सुद्धा अजूनही वाटण्यात आलेली नाही.

आमच्या पत्रकारांनी माहिती घेतल्या प्रमाणे काही पोलिस कर्मचाऱ्यांना पहिल्या दिवशी मास्क दिल्या होत्या पण ते एकदा वापरण्या सारखेच असल्यामुळे ते वापरून संपुन गेले आहे.

आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले की स्वतःच्या रक्षणासाठी आम्हाला ह्या वस्तूच मिळाल्या नाहीयेत अक्षरशः आम्हाला मास्क न मिळण्या मुळे आम्ही आमच्या रुमाल वापरत आहे,असे निदर्शनास आले आहे.

काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा असे म्हणने आहे की आमच्या घरात लहान मुले मुली आहेत आणि आम्ही रस्त्यांवर लोकडाऊनमुळे तैनात आहोत.

आम्ही दिवसभर थांबून जीव धोक्यात घालून ड्युटी करत आहोत आणि घरी गेल्यावर आमच्या घरातील व्यक्तींशी लहान मुलांशी आमचा संबंध येत आहे

जर आम्हाला हा आजार बाहेरून झाला तर त्यांना ही होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनि प्रसार माध्यमातून शासनाला विनंती केली आहे, की आम्हाला या गरजेच्या वस्तू मिळाव्यात ही विनंती केली आहे.
पत्रकार मुज्जम्मील शेख

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages