दौंड शहरातील गरजूंना अन्नदान... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Monday, 27 April 2020

दौंड शहरातील गरजूंना अन्नदान...

दौंड शहरातील गरजूंना अन्नदान...
दौंड शहरातील मुनाफ शेख, नबी शेख, फारुख शेख, जब्बार शेख, हनीफ शेख, मोहसिन शेख नेहमीप्रमाणे या आपत्कालीन परिस्थिती मध्ये देखील आपल्या परिसरातील पानसरे वसाहत, वडार गल्ली, सिद्धार्थ नगर, इंदिरा नगर , खाटीक गल्ली या भागातील गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती, विधवा महिला, ज्यांच्या घरात कोणीही कमावणारी व्यक्ती नाही अश्या कुटुंबाला दररोज दोन वेळा जेवणाची व्यवस्था या शेख कुटुंब आणि त्यांचे सहकारी मित्रांनी केली आहे.
           कोरोना या विषाणुजन्य आजाराची झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाने तीन दिवस महाराष्ट्र लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला होता.
यावेळी शेख कुटुंबियांना काळजी लागली ती या गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या व गरीब विधवा महिला ज्यांच्या घरात कोणीही कमावणारी व्यक्ती नाही अश्या कुटुंबाची परंतू सतत अश्या कुटुंबाला मदत करणाऱ्या या युवकांनी जराही वेळ न घालवता या कुटुंबाला किमान दोन वेळेस जेवण बनवून घरपोच द्यायची व्यवस्था केली.आणि या दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आजाराचा पुढील धोका लक्षात घेता २२ मार्च पासून सलग २१ दिवस लॉक डाऊन वाढवला, तरीही या युवकांनी आपला उपक्रम आजतागायत कायम ठेवला आहे.
दौंड शहरातील अत्यंत गरीब वस्तीत असणाऱ्या या परिसरात जवळपास २३० व्यक्तींना दररोज दोन वेळेस घरपोच जेवणाचे पार्सल देण्याचा उपक्रम या युवकांनी अविरत चालू ठेवला आहे.

1 comment:

  1. Great work...and thanks to all shaikh family and friends..

    ReplyDelete

Post Bottom Ad

Pages