फडणवीस साहेब मराठी तरूणांचा नाद करू नका - राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Sunday, 31 May 2020

फडणवीस साहेब मराठी तरूणांचा नाद करू नका - राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख...

फडणवीस साहेब मराठी तरूणांचा नाद करू नका - राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख.
आज महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करीत आहे, त्याचे श्रेय महाराष्ट्रातील जाणत्या मराठी नेत्यांचे आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र मराठी युवकांकडे कौशल्य नाही असे म्हणतात. याचा खेद वाटतो. फडणवीस साहेब या युवकांचा आधार व्हा, त्यांचा नाद करु नका, असा ईशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी दिला आहे. 
श्री शेख म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असं म्हटले, की परराज्यातील परप्रांतीय मजुरांच्या जाण्यामुळे उत्पन्न झालेल्या रोजगारांच्या संधींमध्ये महाराष्ट्रातील तरुणांकडे कौशल्य नसल्यामुळे त्यांना संधी मिळणार नाहीत महाराष्ट्राच्या तरुणांकडे कौशल्य नाही असे म्हणने दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातील तरुण रोजगारांच्या कमी संधी असल्याने रोजगारापासून वंचित आहेत. त्याच्यामध्ये कौशल्य आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांनी त्यांच्यातील कौशल्य फडणवीस यांना गेल्या निवडणुकीत दाखवले आहे, त्यांनी बहात्तर हजार जागांच्या मेगा भरतीचे गाजर दाखवले. या तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्रातल्या तरुणांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेतून बेरोजगार केले. 
 शेख पुढे म्हणाले, यापुढे देखील महाराष्ट्रातल्या तरुणांचा अपमान करण्याचे काम विरोधी पक्षनेत्यांनी केले. मात्र महाराष्ट्रातील तरुण इतका सक्षम आहे, की येणाऱ्या काळात भाजपला विरोधीपक्ष नेतेपद मिळेल, इतके देखील आमदार निवडून येणार नाही, असे कौशल्य महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये आहे. महाराष्ट्रातला तरुण छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर वाटचाल करणारा आहे, त्यामुळे त्यांचा अपमान करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करीत आहेत.

1 comment:

Post Bottom Ad

Pages