आणखी एका मोठ्या संकटासाठी तयार राहा - WHO ने जगाला दिला इशारा... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Friday, 29 May 2020

आणखी एका मोठ्या संकटासाठी तयार राहा - WHO ने जगाला दिला इशारा...


आणखी एका मोठ्या संकटासाठी तयार राहा - WHO ने जगाला दिला इशारा...
नवी दिल्ली : अमेरिकेत काही दिवस कोरोनाचं प्रमाण काही प्रमाणात कमी झाल्यानंतर आता पुन्हा रुग्णांची संख्या वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिका व्यतिरिक्त ब्राझील (Brazil), रशिया (Russia) आणि भारत (India) या देशात देखील कोरोनाचा कहर सुरू आहे. गुरुवारी जगभरात संक्रमणाची १,१६,३००० हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यानंतर संक्रमणाची एकूण संख्या ६ दशलक्षांच्या जवळपास गेली आहे.
गेल्या २४ तासांत ५००० हून अधिक लोक संक्रमणामुळे मरण पावले आणि आतापर्यंत एकूण मृत्यूंचा आकडा ३,६१,५०० पर्यंत वाढला आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्या १,०१,३३७ वर पोहोचली आहे.
अमेरिकेत संक्रमित लोकांची संख्या सर्वाधिक आहे. इथे १७,१२,८१६ जण संक्रमित आहेत. यानंतर ब्राझील दुसर्‍या स्थानावर आहे, जिथे सुमारे ४ लाख १२ हजार लोकांना संसर्ग आहे. तिसर्‍या क्रमांकावर रशिया आहे. इथे सुमारे ३,८०,००० लोक संसर्गित आहेत.

WHO ने दिली चेतावणी - दुसर्‍या मोठ्या संकटासाठी तयार रहा :-
जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष अधिकारी डॉ.डेव्हिड नाबरो यांनी 'कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसऱ्या धक्क्यासाठी आपण तयार असलं पाहिजे' असं म्हटलं आहे. ते म्हणाले आहेत की "लॉकडाउन जसजसे कमी होतं तसतसं कोरोना संसर्ग प्रकरणात आणखी एक मोठी उडी घेऊ शकते आणि त्यासाठी योग्य तयारी केली पाहिजे. कोव्हिड-१९ मधील मृतांची संख्या चीनपेक्षा जास्त आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत ४,७०६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर चीनने आतापर्यंत ४,६३८ मृत्यूची अधिकृतपणे पुष्टी केली आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जर्मनीत संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं :- 
गेल्या २४ तासांत जर्मनीमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची ७४१ नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. त्यानंतर जर्मनीमध्ये संक्रमणाची संख्या एक लाख ८० हजार ४५८ वर गेली आहे. जर्मनीमध्ये कोव्हिड -१९ मुळे आतापर्यंत ८,४५० लोकांचा मृत्यू झाला आहे. कोव्हिड -१९ पासून गेल्या २४ तासांत ४१ लोकांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

संपुर्ण महाराष्ट्रातील तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे
मुख्य संपादक मुज्जम्मील शेख - ७५०७७३७३१३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages