शहरात ९ मार्च रोजी पहिला करोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर मागील तीन महिन्यांत शहरातील एकूण रुग्णांचा आकडा ७ हजार ७४७ झाला आहे. त्यातील तब्बल ४५७५ जणांना घरी सोडले आहे. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या ६२.७७ टक्के आहे. त्याचवेळी शहरात ३६९ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
एकुण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण .६ टक्के आहे. तर, सध्या शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत सुमारे २४०२ जण उपचार घेत आहे. त्यातील ४५ जणांची प्रकृती गंभीर आहे.
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार १५ मे रोजीच हेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.७ टक्के होते. तर मृत्यूचे प्रमाण ५.७ टक्के होते. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण हे ४२ टक्के होते. मात्र एका बाजूला शहरात बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला उपचार घेऊन घरी जाणाऱ्यांचाही आकडा वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण काही प्रमाणात कमी होत आहे.

Grat News for Punekars 👌👌
ReplyDelete