राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी तारेख मिर्झा व प्रदेशसचिव पदी मिनील काकडे यांची निवड... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Saturday, 11 July 2020

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी तारेख मिर्झा व प्रदेशसचिव पदी मिनील काकडे यांची निवड...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी तारेख मिर्झा व प्रदेशसचिव पदी मिनील काकडे यांची निवड...
मुंबई :- शनिवार दि 11 जुलै रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी तारेख मिर्झा व प्रदेशसचिव पदी मिनील काकडे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिले आहे.
तारेख मिर्झा हे कळंब नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष पदावर यांनी काम केलेले असून हे उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये पक्षाच्या माध्यमातून धडाडीने काम करत आहे. तसेच मिनिल काकडे हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी यांनी काम केले असून व तसेच पुणे जिल्हा व पिंपरी-चिंचवड जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांचे निरीक्षक पदावर त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक व कुशल नेतृत्व करून त्यांनी या दोन्हीही जिल्ह्यात चांगली बांधणी केली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages