शिवाजी महाराज व टिपू सुलतानांवरील धडे कर्नाटक सरकारने अभ्यासक्रमातून वगळले... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Saturday, 1 August 2020

शिवाजी महाराज व टिपू सुलतानांवरील धडे कर्नाटक सरकारने अभ्यासक्रमातून वगळले...

कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागानं कोरोना संकटाचं कारण देत शालेय अभ्यासक्रमातून शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्यावरील धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

यासोबतच विजयनगर साम्राज्य, बहामणी साम्राज्य, राज्यघटनेतील काही भाग आणि इस्लाम, ख्रिश्चन धर्माशी निगडित काही भाग वगळण्याचा निर्णयही घेतला आहे.

याला टिपू सुलतान यांच्या वंशज साहेबजादे सय्यद मंसुर अली यांनी विरोध दर्शविला आहे. 

यासाठी कोरोनाचं संकट हे कारण देण्यात आलं आहे. इयत्ता सहावी ते नववीच्या कोर्सचा कालावधी 220 दिवसांवरून 120 दिवस करण्यात आल्यामुळे हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. शालेय अभ्यासक्रमातील बराचसा भाग आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिकवला जात आहे.

काय काय वगळलं जानार ?

इयत्ता ९ वीच्या समाजशास्त्र विषयातील राजपूत राजघराणाविषयीच्या धड्यांची संख्या 6 वरून 2 वर आणण्यात आली आहे. यामध्ये राजपूत राजघराणं, त्यांचं कार्य, तुर्कांचं आगमन आणि दिल्लीतील सुलतान यांचा समावेश होता

यातील राजपूत यांचं योगदान आणि दिल्ली सुलतानांविषयीचा भाग वगळण्याचा कारण हे इयत्ता सहावीत शिकवण्यात आल्याचं सांगितलं आहे.

उदा. मुघल आणि मराठा साम्राज्यावरील धडा वगळण्यात आला आहे. याविषयीच्या धड्यांची संख्या 5 वरून 2 करण्यात आली आहे. यातून मराठा साम्राज्याचा उदय, शिवाजी महाराजांचं प्रशासन आणि त्यांचे उत्तराधिकारी हे धडे वगळण्यात आले आहेत. इयत्ता सातवीत हा भाग शिकवला गेल्यामुळे असं करण्यात आल्याचं सांगितलं आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages