आमदार अशोकबाप्पु पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त वृक्षारोपण... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Tuesday, 1 September 2020

आमदार अशोकबाप्पु पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त वृक्षारोपण...

शिरूर हवेली तालुक्याचे आमदार अशोकबाप्पु पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पिंपळे जगताप येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम युवानेते संदीप जगताप यांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
वाढदिवस दिनी शुभेच्छा म्हणून प्रत्येकाने झाड लावून वृक्षारोपण केले. या कार्यक्रमाला गावकऱ्यांच्या वतीने चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी शिवाजी बाजीराव जगताप, दत्तोबा थिटे, शहाजी तांबे, नानासाहेब जगताप, अण्णा दौंडकर, सुनील बेंडभर, उत्तम बेंडभर, ऋषी थिटे, शैलेश जगताप, विशाल तांबे आणि पिंपळे जगताप गावातील ग्रामस्थ उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages