अबबबब...!!! कोरोना सर्व्हेच्या नावाखाली चाललंय तरी काय ? - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Monday, 28 September 2020

अबबबब...!!! कोरोना सर्व्हेच्या नावाखाली चाललंय तरी काय ?

अबबबब...!!! कोरोना सर्व्हेच्या नावाखाली चाललंय तरी काय ?
पुुणे शहरात कोरोना सर्व्हेच्या नावाखाली घरात शिरण्याच्या काही तक्रारी कानावर आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला घरात प्रवेश देण्याआधी त्याचे ओळखपत्र तपासणे गरजेचे आहे. संशयास्पद वाटल्यास तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला (100) फोन करण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या नावाखाली काही जणांकडून सर्व्हेची बतावणी घरात शिरण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासकीय विभागाचे कर्मचारी असल्याचे सांगून घरात शिरत असल्याच्या काही तक्रारी कानावर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही व्यक्तीला घरात प्रवेश देऊ नये. 

संशयित व्यक्ती वाटल्यास काय करावे?
प्रथमतः संबंधिताला त्यांचे ओळखपत्र विचारण्यास प्राधान्य द्यावे. काही संशयास्पद वाटत असल्यास तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती देण्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात काम करताना गंभीर गुन्हे व गुन्हेगारांवर विशेष लक्ष देण्यावर भर देण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांना रात्रीच्या वेळी सुरक्षित वाटले पाहिजे, असे वातावारण तयार करण्याचा प्रयत्न राहणार आहे, त्यासाठी बेसिक पोलिसांवर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

              👇👇Advertise Here 👇👇
              ☝️☝️ Advertise Here ☝️☝️

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages