दौंड :- (प्रतिनिधी विशाल घिगे)- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना केडगाव शहरच्या वतीने दौंड उपतालुकाप्रमुख सदाभाऊ लकडे यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी युवासेना दौंड विधानसभा प्रसिद्धी अधिकारी निलेश शिवाजीराव मेमाणे, शिवसेना केडगांव स्टेशन शाखाप्रमुख स्वप्निल भुजबळ, उपशाखाप्रमुख कृष्णा जाधव विशाल जाधव, ताहेर शिकीलकर, सिकंदर तांबोळी, फैजभाई सय्यद, सचिनभाऊ लोखंडे आदी शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment