राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशची कार्यकारिणी जाहीर... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Wednesday, 16 December 2020

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशची कार्यकारिणी जाहीर...

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशची कार्यकारिणी जाहीर...

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशची नवीन प्रदेश कार्यकारिणी आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हा २०२९ च्या निवडणुकीचा मुख्य पाया आहे, असे मत जयंत पाटील यांनी यावेळी मांडले. मागील कालखंडात यश-अपयश अनुभवत आपण पक्ष मोठा केला, आजही करत आहोत. त्यामुळे २०२९ च्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील, असं काम आपल्याला करायचं आहे, असे ते म्हणाले. त्यासाठी सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांबरोबरच महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात  आपली संघटना असायला हवी. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे प्रश्न  संघटनेने प्राधान्याने मांडावेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, असे मार्गदर्शन जयंत पाटील यांनी उपस्थितांना केले. त्याचबरोबर विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांची विद्यार्थी संघटनेच्या कार्याबद्दल खूप प्रशंसा केली आहे.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान यांनी बैठकीला संबोधित करताना राजकारणापेक्षा समजाकार्यावर भर देण्याचे आवाहन केले. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हे पद कायमस्वरूपी नाही, जो काम करेल त्याला पदावर राहता येईल, एकदा काम करणं थांबलं की पद राहणार नाही याची जाणीव सर्वांनी ठेवायला हवी. नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून प्रत्यकाने समाजाप्रती काम केले पाहिजे असेही ते म्हणाले. 
या कार्यक्रमास आ.अमोल मिटकरी, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, याचबरोबर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशचे विभागीय अध्यक्ष सुहास कदम, संध्या सोनवणे, प्रशांत कदम, किरण शिखरे, चिन्मय गाढे, अविनाश चव्हाण, आशिष आवळे त्याचबरोबर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माहिती तंत्रज्ञान अध्यक्ष जितेश सरडे व जावेद ईनामदार आदी मान्यवर तसेच विद्यार्थी संघटनेचे नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी खालील पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली.
प्रदेश सरचिटणीस - विभागनिहाय :- 
1 - आशिष बाबुराव वाघमारे (लातुर) - मुख्य 
2 - डॉ.श्रीराम शिवाजीराव रगड (बुलढाणा) (BAMS) - वैद्यकीय
3 - सुधीर चंद्रहास शिरसाठ (अहमदनगर) - अभियांत्रिकी
4 - अमोल रामदास पाटील (नाशिक) - औषधनिर्माण
5 - सुयश उदयसिंह पाटील (सांगली) - कृषी
6 - रोहित अंबादास अहिरे (नाशिक) - व्यवस्थापण
7 - गणेश शंकरराव डिंबळे (पुणे) - विधी
8 - अमित नानाभाऊ कुटे (बीड) - कला वाणज्य विज्ञान
9 - सादिक इलीयास शेख (औरंगाबाद) - शालेय शिक्षण
10 - मधुकर रघुनाथ सावंत (औरंगाबाद) - ललितकला
12 - नेताजी मारुतीराव साळुंके (बीड) - शिष्यवृत्ती,
13 - सौरभ राजेंद्र देशमुख (अहमदनगर) - रोजगार
16 - तुषार पोपटराव जगताप (पुणे) -  कौशल्य विकास

● प्रदेश निरीक्षक :- 
1 - ऋषी रवी परदेशी (पुणे)
2 - अतुल संपतराव शिंदे (सातारा)

● प्रदेश सचिव :- 
1 - मुज्जम्मील अब्दुल्ला शेख (पुणे)

● जिल्हाध्यक्ष :-
1 - अमोल गजानन काळणे - अकोला ग्रामीण 
2 - अभिजीत रामेश्वर हिंगणे - अकोला शहर (जिल्हा)
3 - रितेश रणजित बोबडे - यवतमाळ
4 - भूषण दिगंबर दाभाडे -  बुलढाणा
5 - प्रथमेश प्रकाशराव ठाकरे - अमरावती
6 - ज्ञानेश बाळासो पाटील - सांगली
7 - राहुल अनिल कवडे - सोलापुर
8 - डॉ. वैभव लक्ष्मण कळसे - सातारा
9 - रोहित गमलादु - उल्हासनगर
11 - यश दत्तात्रय साने - पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)

● प्रदेश संघटक :- 
1 - मुबीन शौकद मुल्ला (कोल्हापूर)
2 - ओंकार महेंद्र गुंड (अहमदनगर)
3 - नागेश अनिल खळदकर (पुणे)
4 - आदित्य ज्ञानेश्वर टाले (अमरावती)
5 - जावेद ईनामदार (पुणे)

● सोशल मीडिया प्रदेश समन्वयक :- 
1 - शुभम बंडू जठाळ (लातुर)

● पर्यावरण समीती प्रदेश समन्वयक :- 
1 - शिवशंभु हुकूमचंद पाटोळे (पुणे)
2 - यश संजय कुलकर्णी (अहमदनगर)

● मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष - विभाग निहाय :-
1 - डॉ.अमोल भगवान धदंरे (BHMS) (हिंगोली) - वैद्यकीय
2 - आकाश गौतम हिवराळे (औरंगाबाद) - औषधनिर्माण
3 - स्वप्निल नामदेव माने (उस्मानाबाद) - कृषी 

● नागपूर विभागीय उपाध्यक्ष - विभाग निहाय :- 
1 - डॉ उदय प्रकाश बोरकर (MBBS) (अमरावती) - वैद्यकीय

●अमरावती विभागीय उपाध्यक्ष - विभाग निहाय :- 
1 - डॉ.रवी परमेश्वर सपकाळ (MBBS) (बुलढाणा) - वैद्यकीय
2 - विवेक प्रल्हाद सावडे (यवतमाळ) - औषध निर्माण
3 - वैभव शंकरराव बोरकर (वाशीम) - कृषी

● नाशिक विभागीय उपाध्यक्ष - विभाग निहाय :- 
1 - डॉ .निलेश दिलीप मोरे (BDS) (नाशिक) - वैद्यकीय
2 - परीक्षीत सुनिल तळोकार (नाशिक) - अभियांत्रिकी
3 - शुभम शामलाल बंब (अहमदनगर)- विधी

● पश्चिम विभागीय उपाध्यक्ष - विभाग निहाय :- 
1 - डॉ . सहर्ष विठ्ठल घोलप(BAMS) (अहमदनगर) -   वैद्यकीय
2 - विनोद विक्रम भांगे (सोलापुर) - कृषी 
3 - अनुप अंकुश कारंडे (सांगली) - व्यवस्थापण

● कोकण विभागीय उपाध्यक्ष - विभाग निहाय :- 
1 - डॉ. सागर पानचंद पाटील (धुळे) - वैद्यकीय

● पुणे विभागीय उपाध्यक्ष - विभाग निहाय :- 
1 - डॉ. उमेश रोहीदास चव्हाण(BAMS) - वैद्यकीय
2 - भैरव राजेंद्र साठे (पुणे) - अभियांत्रिकी
3 - संकेत कंताराम वायकर (पुणे) - कृषी

● विद्यापीठ अध्यक्ष :- 
1 - सुवर्णभूषण देसाई (सांगली)- अध्यक्ष शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

या वरील पदांवरील नियुक्त्या करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages