पुणे शहरातील पोलिसांची एका पाठोपाठ एक उत्तम कामगिरी ; मार्केटयार्ड पोलीस स्टेशन मधील फरार आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणले... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Wednesday, 13 January 2021

पुणे शहरातील पोलिसांची एका पाठोपाठ एक उत्तम कामगिरी ; मार्केटयार्ड पोलीस स्टेशन मधील फरार आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणले...

पुणे शहरातील पोलिसांची एका पाठोपाठ एक उत्तम कामगिरी ; मार्केटयार्ड पोलीस स्टेशन मधील फरार आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणले...

पुणे :- मार्केटयार्ड पोलीस ठाणे, गु.र.न,३८१/२०२०, मादवि कलम - ३९२,३९४ या कलम अंतर्गत अभिजीत आण्णां खंडागळे, वय- २५ वर्षे, रा.- साईसिदधी चौक, आंबेगाव पठार, जंगलाचे जवळ यांना दिनांक १४/१२/२०२० रोजी गेट नं, ०४.मार्केटयार्ड पुणे येथे तीन इसमांनी शस्त्राचा धाक दाखवुन फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन फिर्यादी यांचे जवळील विवो कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे ११०००/- रुपयांचा जबरीने हिसकावुन नेलेला होता. तसेच सिक्युरीटी गार्ड व इतर गाडी चालकांना शस्त्राचा धाक दाखवुन मारण्याची धमकी दिली. सदर गुन्ह्यातील तीन आरोपींपैकी गुन्हा घडल्यापासून फरार असलेला एक आटोपी नामे शहारुख ऊर्फ चांगा मेहबुब खान रा. स.न.५७० आंबेडकरनगर, मार्केटयार्ड पुणे याची मार्केटयार्ड पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार अजिम शेख यांना त्यांचे बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की. सदरचा आरोपी हा अहमदपुर जि.लातुर येथे त्याच्या दाजीकडे राहत आहे. अश्या मिळालेल्या बातमीनुसार वरिष्ठांची परवानगी घेवुन दिनांक ०३/०१/२०२१ रोजी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक के.बी.डाबेराव, पोलीस अंमलदार अजिम शेख, स्वप्निल कदम, अनिस शेख असे सदर ठिकाणी जावुन आरोपीला अटक केले.
सदरचा गुन्हा अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, यांचे अधीपत्याखाली व पोलीस उपआयुक्त, परिमंडळ - ०५, पुणे शहर, सहा.पोलीस आयुक्त, वानवडी विभाग. सविता ढमढेरे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मार्केटयार्ड पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक के.बी.डाबेराव, पोलीस अंमलदार अजिम शेख, स्वप्निल कदम व अनिस शेख यांनी उघडकीस आणला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages