प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कविसंमेलन थाटात संपन्न... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Wednesday, 27 January 2021

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कविसंमेलन थाटात संपन्न...

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कविसंमेलन थाटात संपन्न...

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेने राज्यस्तरीय भव्य काव्यसंमेलनाचे ऑनलाईन आयोजन संस्थेचे संस्थापक शेख शफी बोल्डेकर, सहसचिव कवयित्री अनिसा ए.एस.कार्याध्यक्ष डॉ. रफी शेख सोशल मीडियाप्रमुख शबाना मुल्ला यांच्या नियोजनाखाली थाटात संपन्न झाले. कविसंमेलनची सुरुवात कवयित्री अनिसा शेख यांनी संविधान प्रास्ताविक वाचनाने केली. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान कवीवर्य हबीब भंडारे , औरंगाबाद यांनी भूषविले तर कविसंमेलनचे उद्घाटन जेष्ठ साहित्यीक कविवर्य ज.वि.पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ज. वि. पवार यांनी विद्रोही कविता वाचनाने कविसंमेलनाची सुरूवात केली. कविसंमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून कवि धनंजय मुळे व कवयित्री मलेका शेख यांची उपस्थिती लाभली. 
        कविसंमेलनचे सूत्रसंचालन मा.डॉ.म.रफी शेख व कवयित्री निलोफर फणीबंद यांनी केले.
           कविसंमेलनमध्ये राज्यभरातील कविवर्यांनी सहभाग नोंदवला व आपल्या विविध कवितांनी संमेलनाची शोभा वाढवली.यात कवी गौसपाशा शेख, कवी शेख जाफरसाहब, कवी बी.एल.खान, कवी युवराज जगताप,  कवयित्री चित्रा पगारे, कवी अय्युब नल्लाबंदू, कवी लक्ष्मण जाधव, कवी दत्ता दौलतराव पेंदोर, कवी मोहीद्दीन अकबर नदाफ, कवयित्री शबाना मुल्ला, कवी अनिल नाटेकर, कवी जाकिरहुसेन हलसंगी, कवयित्री अॅड शबाना मुल्ला,कवी ज्ञानेश्वर दशरथ गायकवाड , कवी सौरभ आहेर आदी कवींनी आपल्या विविध रचना सादर केल्या.
          ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे विश्वस्त कवी जाफरसाहाब शेख यांनी आभार व्यक्त केले . तब्बल तीन तास चाललेल्या या कविसंमेलनाची सांगता अध्यक्ष हबीब भंडारे यांच्या मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं कविता वाचनाने करण्यात आली.

1 comment:

Post Bottom Ad

Pages