जामीअह मखजनुल उलूम मदरसा तर्फे गरजूंना DYSP पोलीस उपअधिक्षक मयूर भुजबळ यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Sunday, 9 May 2021

जामीअह मखजनुल उलूम मदरसा तर्फे गरजूंना DYSP पोलीस उपअधिक्षक मयूर भुजबळ यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप...

जामीअह मखजनुल उलूम मदरसा तर्फे गरजूंना DYSP पोलीस उप अधिक्षक मयूर भुजबळ यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप...

दौंड : जामीअह मखजनुल उलूम या मदरसा तर्फे गरजू लोकांना अन्न धान्य तसेच किराणा साहित्याचे वाटप दौंड पोलीस स्टेशनचे परि. पोलीस उपअधीक्षक (DYSP) मयूर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. गेली वर्ष भरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतीला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊन तसेच इतर काही प्रभावी योजना आखल्या जात आहेत. लॉकडाऊन मुळे ज्यांचे पोट हातावरती आहे, अशांना रोजगारच नसल्याने आर्थिक परिस्थिती कमकुवत बनत चालली आहे. या लोकांना दौंड येथील मदरसा जामिया मखजनुल उलूम तर्फे सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यापुढे ही असेच समाजासाठी उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे संस्थेचे चेअरमन मौलाना हाफिज हारून अबूबकर शेख यांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोहेल रज्जक इनामदार यांनी आर्थिक मदत केली आहे. व उर्वरित मदत मदरसा तर्फे करण्यात आली. यावेळीस पोलीस उपनिरीक्षक भगवानराव पालवे, आण्णासाहेब देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल करचे, दिनेश पवार उपस्थित होते. व हाजी अय्युब अबूबकर शेख, समीर शेख, साबीर शेख, मौलाना हाफिज मुद्दसिर, सलमान शेख व आदी यांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages