बारामती लोकसभा मतदारसंघातील युवकांनी बांधले हाती शिवबंधन ; शिवसेनेत केला जाहीर प्रवेश... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Thursday, 24 June 2021

बारामती लोकसभा मतदारसंघातील युवकांनी बांधले हाती शिवबंधन ; शिवसेनेत केला जाहीर प्रवेश...

बारामती लोकसभा मतदारसंघातील युवकांनी बांधले हाती शिवबंधन ; शिवसेनेत केला जाहीर प्रवेश...

बारामती लोकसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी यांची बैठक पुणे येथील हॉटेल विवा इन येथे पार पडली. युवासेना प्रदेश सचिव वरूण सरदेसाई व युवा सेना विस्तारक गणेश कवडे यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी युवा सेनेत जाहीर प्रवेश करत हाती बांधले शिवबंधन.
यावेळी प्रवेश केलेल्या युवक रोहित कडू, फैज सय्यद, विकास शितोळे, निलेश मोहिते, विजय हाडके, विशाल वाघ,धनंजय केदारी, शुभम बारवकर, निलेश चव्हाण, शशिकांत बारवकर यांनी हाती शिवबंधन बांधले. यावेळेस युवा सेना जिल्हा अधिकारी सचिन पासलकर, विजयसिंह चव्हाण, समीर भोईटे, निखिल देवकाते ,शिवाजी काळे,योगेश फडके,दत्तात्रय चव्हाण,सागर शितोळे,पांडुरंग शिंदे,उपस्थित होते असे युवा सेना दौंड तालुका प्रसिद्धी आधिकारी निलेश मेमाणे यांनी सांगितले. व तसेच त्यांनी सांगितले आहे की, लवकरच आम्ही आणखी इतर पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचे प्रवेश घेणार आहोत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages