‘ब्रेक दि चेन’ मोहिमेअंतर्गत राज्यात अनलॉकची नवी नियमावली जाहीर... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Sunday, 8 August 2021

‘ब्रेक दि चेन’ मोहिमेअंतर्गत राज्यात अनलॉकची नवी नियमावली जाहीर...

‘ब्रेक दि चेन’ मोहिमेअंतर्गत राज्यात अनलॉकची नवी नियमावली जाहीर...
 
सर्वसामान्यांसह व्यापारी, दुकानदारांना महाविकास आघाडी सरकारचा मोठा दिलासा...

राज्य सरकार सरकारने ‘ब्रेक दि चेन’ मोहिमेअंतर्गत नवी नियमावली आज जाहीर केली आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यातील २५ जिल्ह्यांमधील नियम शिथील करण्यात आले असून वीकेंड लॉकडाऊनमध्येही काहीसा दिलासा देण्यात आला आहे. येत्या ४ ऑगस्टपासून ही नवी नियमावली लागू होईल. नव्या नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याने दुकानदार आणि व्यापारी वर्गाला दिलासा मिळणार आहे. मात्र, या नियमावलीअंतर्गत राज्यातील रुग्णसंख्या अधिक असलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये लेवल ३ चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत . यामध्ये पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर,  बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर, मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात जुन्या नियमवालीतून वगळण्याबाबतचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत घेण्यात येणार आहे.  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता जनतेने सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवी नियमावली :-
- सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सर्व दुकानं खुली ठेवण्यास परवानगी.
- शनिवारी दुपारी ३ पर्यंत सर्व दुकाने खुली राहणार 
-  रविवार वगळता मॉल्स देखील खुले राहणार
- रविवारी फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू
- सर्व खासगी आणि शासकीय कार्यालयं ही संपूर्ण क्षमतेने खुली राहणार
- सर्व उद्याने, मैदाने खुली राहणार 
- हॉटेल्स दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने खुली राहतील. विकेंडला केवळ पार्सल सेवा सुरू राहील.
- ब्युटी पार्लर, स्पा, हेअर सलून, जिम, योगा क्लासेस सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत, शनिवारी दुपारी ३ पर्यंत ५०  टक्के क्षमतेने खुले राहणार, रविवारी पूर्ण बंद राहतील. 
- सिनेमागृह, मस्टिप्लेक्सना अद्याप परवानगी नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages