अवैध धंदे बंद करण्याबाबत ईनाम गुडाकूवाला यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Sunday, 26 September 2021

अवैध धंदे बंद करण्याबाबत ईनाम गुडाकूवाला यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...

पुणे :- सध्या पुण्यात पाटील इस्टेट पुणे स्टेशन या भागात अवैध धंद्यांचे प्रकार वाढले असून गांजा, अमली पदार्थ व बेकायदेशीर धंदे यांचे प्रमाण वाढलेले असून हे अवैधधंदे वेळीच रोखले जाणे अत्यंत आवश्यक आहे. जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणे अत्यंत आवश्यक आहे चोऱ्यामाऱ्या लुटालुटीचे धंदे थांबवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी विश्वमानव अधिकार संघटनेला विविध संस्थांच्या माध्यमातून अर्ज व विनंत्या करून न्याय मागत होते.
ते गांभीर्याने घेता, त्या लोकांचे मागणी लक्षात घेता विश्व मानवाधिकार परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य सरचिटणीस ईनाम गुडाकूवाला यांनी दि 23 सप्टेंबर (गुरुवार) रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. व त्यामध्ये त्यांनी ताबडतोब शासकीय यंत्रणांनाकडून तत्पर कारवाई करून हे अवैध धंदे बंद करण्यात यावे अशे निवेदन दिले आहे. त्यावेळीस अखिल भारतीय इराणी समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अलीरजा परवेज इराणी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. व तसेच हे अवैध धंदे बंद व्हावे यासाठी अखिल भारतीय इराणी समाज विकास संस्थेचा उपोषण सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages