अवैद्यरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराच्या मार्केटयार्ड पोलिसांनी आवळल्या मुसक्या..... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Tuesday, 5 October 2021

अवैद्यरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराच्या मार्केटयार्ड पोलिसांनी आवळल्या मुसक्या.....

अवैद्यरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराच्या मार्केट यार्ड पोलिसांनी आवळल्या मुसक्या.....

पुणे :- पुणे शहरातील दिवसा ढवळ्या अनेक घटना घडत आहेत त्यामध्येच आणखीन एक भर पडली आहे. परंतु पुणे शहरातील मार्केट यार्ड पोलिसांच्या दक्षते मुळे व खबरदारी मुळे खूप मोठे प्रसंग होण्यापासून वाचले आहे. मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधपणे पिस्तूल बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यास मार्केट यार्ड आंबेडकर नगर येथे सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याचेकडे ऐक पिस्तूल  व एक जिवंत काडतुस मिळून आले असल्याने त्यास मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली आहे.
त्याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 4/10/2021 रोजी मार्केट यार्ड पोलीस ठाणे कडील तपास पथकातील कर्मचारी स्वप्नील कदम यांना त्यांचे बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, मार्केट यार्ड पोलीस स्टेशन हद्दीत आंबेडकर नगर वसाहत गल्ली नंबर 14 जवळील सार्वजनिक शौचालय च्या मागे एक इसम उभा असून. त्याच्या अंगावर चॉकलेटी रंगाचा हाफ बाह्यांचा शर्ट राखाडी रंगाची पॅंट असून अवैधरित्या पिस्तूल बाळगत आहे .त्याच्या हातून कोणतातरी गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आहे .अशी बातमी मिळाल्याने स्वप्निल कदम यांनी सदरची बातमी मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती देशपांडे व पोलिस निरीक्षक गुन्हे श्रीमती सविता ढमढेरे यांना सांगितले असता त्यांनी तपास पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाई बाबत सूचना देऊन सापळा रचून इसमाला ताब्यात घेण्यास सांगितले.

              वरिष्ठांकडून मिळालेल्या सूचनाप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक गिरी व पोलीस अमलदर पवार , जाधव , कदम,  यादव , शेख, घुले, भिलारे, जाधव, चव्हाण, औधकर, कुंभार, दिवटे यांच्यासह मार्केट यार्ड आंबेडकर नगर गल्ली नंबर 14 जवळ सापळा रचून बातमीदाराकडून अधिक माहिती काढून सदर इसम गल्ली नंबर 14 शेजारील सार्वजनिक शौचालयाच्या मागे पंचांसमक्ष ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यास त्याने नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे, नाव - निलेश कुमार ओंकारनाथ मौर्या वय 24 वर्ष राहणार आंबेडकर नगर मार्केट यार्ड पुणे असे असल्याचे सांगितल्याने त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता. त्याच्या डाव्या बाजूच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल त्याचे  अंगझडती मधे  मिळून आले. त्यावेळी त्यास सदरचे पिस्तुलचा परवाना आहे का ? याबाबत पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी त्यास पंचांसमक्ष विचारता. त्याने परवाना नसलेचे सांगितले. तसेच त्यावेळी सदरचे पिस्तूल कोणाची आहे व कोठून आनले याबाबत विचारले असता . त्याने पिस्तूल माझेच आहे, असे सांगून कोठून आणले याबाबत उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी सदरचे पिस्तूल सुरक्षित रित्या ताब्यात घेऊन मध्यभागी असलेला गोल फिरणारे मॅक्झिन बाहेर काढून चेक केले असता. त्यामध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याच्या विरुद्ध मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्याचा पुढील तपास सपोनि मुंडे, मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कारवाई पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण,परिमंडळ पोलीस 5 चे उप - आयुक्त नम्रता पाटील, वानवडी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे  यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक ए.व्ही.देशपांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सविता ढमढेरे यांचे सूचना प्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम व महिला पोलीस निरीक्षक मनीषा गिरी, पोलीस अमलदार, पवार , किरण जाधव, स्वप्निल कदम, आशिष यादव, संदीप घुले, अनिस शेख, पांडुरंग भिलारे, कुभार,जाधव ,चव्हाण, औंधकर,चव्हाण ,दिवटे यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages