जमियते अहिले हदीसचे बिलाल पटेल व न्यू युनिक फाऊंडेशनच्या वतीने हिजामा कपिंग शिबिराचे आयोजन... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Tuesday, 26 October 2021

जमियते अहिले हदीसचे बिलाल पटेल व न्यू युनिक फाऊंडेशनच्या वतीने हिजामा कपिंग शिबिराचे आयोजन...

जमियते अहिले हदीसचे बिलाल पटेल व न्यू युनिक फाऊंडेशनच्या वतीने हिजामा कपिंग शिबिराचे आयोजन...
पुणे :- कोंढाव्यामध्ये जमियते अहिले हदीस संघटनेचे बिलाल पटेल व न्यू युनिक फाऊंडेशनचे अध्यक्ष मुज्जम्मील शेख यांच्या वतीने हिजामा कपिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जमियते अहिले हदीस संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नईम पटेल यांच्या हस्ते झाली. या शिबिरामध्ये 200 पुरुष व महिलांनी या शिबिरात सहभाग घेतला. कोंढवा येथील रहिवाशांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी रविवारी कोंढाव्यातील रॉयल केअर क्लिनिक, अल फलाह मस्जिद समोर मिठानगर येथे हिजामा कपिंग थेरपी शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये कोंढवा भागातील सुमारे 200 लोकांना हिजामा कपिंग थेरपी पद्धतीसह उपचार करण्यात आले. शिबिरात डॉ.झोहेब शेख, डॉ.सादिका शेख व त्यांच्या टीमने सेवा दिली. हे शिबीर सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत चालले. या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला अकिल मुजावर, जावेद ईनामदार, गणेश टाक, तालिब मदारी व आदी मान्यवरांनी भेट दिली. या कार्यक्रमामध्ये अब्दुल रहमान दुर्रानी, बासिद पटेल, असलम शेख, रकीब पटेल, मुबशीर शेख, तल्हा शेख, मामुर रशीद, रिजवान मलिक, जिशान अन्सारी,  हाफिज याहीया फैजी, समीर इंजरवाले, जावेद खान, अकिल दलवाई यांच्यासह सहकारी तरुणांनी शिबिराच्या यशासाठी सक्रिय योगदान दिले व  सहकार्य केले. 

1 comment:

  1. dafabet dafabet 카지노 카지노 카지노사이트 카지노사이트 fun88 soikeotot fun88 soikeotot starvegad starvegad 카지노 카지노 m88 m88 matchpoint matchpoint jeetwin jeetwin 567

    ReplyDelete

Post Bottom Ad

Pages