फरासखाना पोलीसांनी सराईत वाहन चोराच्या मुसक्या आवळुन ४ चोरीच्या दुचाकी गाडया केल्या जप्त... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Thursday, 18 November 2021

फरासखाना पोलीसांनी सराईत वाहन चोराच्या मुसक्या आवळुन ४ चोरीच्या दुचाकी गाडया केल्या जप्त...

फरासखाना पोलीसांनी सराईत वाहन चोराच्या मुसक्या आवळुन ४ चोरीच्या दुचाकी गाडया केल्या जप्त...
पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पुणे शहरामध्ये वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वाहन चोरांवर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार फरासखाना पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी फरासखाना पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना वाहन चोरांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबतच्या सुचना दिलेल्या आहेत. फरासखाना पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील प्रभारी अधिकारी अभिजीत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक हे तपास पथकातील पोलीस अंमलदारांसह वाहन चोरांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार संदीप कांबळे यांना पुणे पोलीस आयुक्तालयातील रेकॉर्डवरील आरोपी गणेश मल्लेश रायचुर, वय २५ वर्षे, रा. ळ रा. ५४ एच पी लोहीयानगर, फायरब्रिगेड समोर, गल्ली नंबर ५, कांबळे गल्ली, पुणे हा चोरीची दुचाकी गाडी घेवुन थांबला आहे अशी बातमी मिळाल्याने फरासखाना पोलीसांनी दुधभट्टी गणेश पेठ, पुणे या ठिकाणाहुन गणेश रायचुर हा त्याचे ताब्यात ऍक्टीव्हा दुचाकी गाडी क्रमांक MH.12.KW.1836 यासह ताब्यात घेतले. सदर गाडीबाबत फरासखाना पोलीस स्टेशन गुरंनं १८५/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजल्याने त्यास नमुद गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे. अटके दरम्यान आरोपी गणेश रायचुर याचेकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अभिजीत पाटील, पोलीस उप निरीक्षक अजितकुमार पाटील यांनी आरोपीकडे तपास करता त्याने आणखीन चार गाडया चोरी केल्याची कबुली देवुन त्याने सदरच्या गाडया निवेदन पंचनाम्याने काढुन दिल्या आहेत. गाडयांबाबत खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. :- 
१. ऍक्टीव्हा दुचाकी गाडी तिचा नंबर एम.एच.१२.एन.टी.५४८८ या गाडीबाबत फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १८८/२०२१ भादवि कलम ३७९ 
२. होंडा कंपनीची शाईन दुचाकी गाडी तिचा नंबर एम.एच.१२.के.डब्ल्यु ९०२३ या गाडीबाबत फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १७३/२०२१ भादवि कलम ३७९ 
३. यमाहा कंपनीची दुचाकी गाडी तिचा नंबर एम.एच.१२.बी.झेड २७६१ या दुचाकी गाडीबाबत फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १८३/२०२१ भादवि कलम ३७९
वरील प्रमाणे ४ दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असुन सदरचे दुचाकी वाहने आरोपीकडुन गाडया जप्त करण्यात आली आहेत. तसेच सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत वाहन चोर असुन त्याचेकडुन आणखीन गुन्हे उघडकीस होण्याची दाट शक्यता असुन त्याचेकडे पुढील तपास अजितकुमार पाटील, तेजस्वी पाटील, पोलीस उप निरीक्षक हे करीत आहेत. सदरची कारवाई अभिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर, डॉ. रविंद्र शिसवे सह पोलीस आयुकत पुणे शहर, श्राजेंद्र डहाळे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, डॉ. प्रियंका नारनवरे पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ पुणे, सतिश गोवेकर सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशन कडील राजेंद्र लांडगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अभिजीत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस अंमलदार संदीप कांबळे, समीर माळवदकर, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, सयाजी चव्हाण, वैभव स्वामी, राकेश क्षिरसागर, ऋषीकेश दिघे, अभिजीत शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages