पुणे : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक मिळाली आहे, व खलिस्तानी आतंकवादी म्हणून शीख समाजाला संबोधले आहे. त्यामुळे तिच्यावर संपूर्ण देशभरातून टीका करण्यात आली होती. याचदरम्यान नरेंद्र मोदींनी शेतकरी विरोधातील 3 कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. यानंतर कंगनाने रद्द करण्यात आलेल्या कृषी कायद्यावरुन वादग्रस्त वक्तव्य करत पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे. तिच्या या वक्तव्यावरून मुंबई शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे कंगनाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी हि तक्रार दाखल करण्यात आली.
कंगनाने आपल्या पोस्टमध्ये काय लिहिले ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे रद्द केल्यानंतर मोदी सरकारच्या या निर्णयावर अभिनेत्री कंगना राणावतने नाराजी व्यक्त केली. तिने आपल्या पोस्टमध्ये कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दु:खद आणि लज्जास्पद असल्याचे सांगून मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे, असे म्हटले होते.
शीख समुदायाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने केली पोस्ट
“
शीख समुदायाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने ही पोस्ट जाणूनबुजून तयार करण्यात आली होती.
त्यानंतर ती सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो की या वक्तव्याविरोधात प्राधान्याने तक्रार दाखल करुन घ्यावी. तसेच याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.
'कंगनाच डोकं "खाली" "स्थान" ;लवकरच कंगना विरोधात गुन्हा नोंद करणार?
पुणे कॅम्प शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे जनसंपर्क अधिकारी मोहिंदर सिंग कंधारी यांनी शिखांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल कंगनावर जोरदार टीका केली 'कंगनाचा डोकं ठिकाण्यावर नाही त्याच डोकं म्हणजे "खाली" "स्थान" झाल्यासारखा दिसतंय तसेच भोला सिंग अरोरा यांनी सांगितले कि, आम्ही लवकरच कंगना विरोधात गुन्हा नोंद करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितले आहे. अशी मागणी सिरसा यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे. तसेच तिच्यावर सरकारने कारवाई करावी असेसुद्धा ते म्हणाले.

No comments:
Post a Comment