मोहसीन शेख यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रमांचा आयोजन करणार - वसीम कुरेशी - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Saturday, 8 January 2022

मोहसीन शेख यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रमांचा आयोजन करणार - वसीम कुरेशी

मोहसीन शेख यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रमांचा करणार आयोजन - वसीम कुरेशी 
पुणे - पुण्यातील हसन भाई शेख प्रतिष्ठानाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मोहसीन भाई शेख यांचा येत्या 14 जानेवारी रोजी वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याकडून व त्यांच्या सहकाऱ्यांकडून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यांना मानणारा वर्ग मोठा असून त्यांच्याकडून वेगवेगळे उपक्रम घेतले जातात.
यावर्षी देखील मोहसीन शेख यांचे सहकारी वसीम कुरेशी यांच्याकडून गरजूंना अन्नधान्य वाटप, अनाथ आश्रम मध्ये खाऊ आणि शालेय वस्तू वाटप व मास्क वाटप अशाप्रकारच्या अनेक वेगवेगळे उपक्रम वाढदिवसानिमित्त खर्च टाळून हे समाजोपयोगी कार्यक्रम घेणार असल्याचे वसीम कुरेशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages