न्यू युनिक फाउंडेशन तर्फे दिनेश तावरे परिमंडळ अधिकारी (नायब तहसिलदार) यांचा सन्मान... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Tuesday, 22 February 2022

न्यू युनिक फाउंडेशन तर्फे दिनेश तावरे परिमंडळ अधिकारी (नायब तहसिलदार) यांचा सन्मान...

न्यू युनिक फाउंडेशन तर्फे दिनेश तावरे परिमंडळ अधिकारी (नायब तहसिलदार) यांचा सन्मान...
पुणे :- परिमंडळ कार्यालय अ व ज विभाग निगडी, विभागाचे परिमंडळ अधिकारी तथा नायब तहसिलदार दिनेश तावरे यांचे न्यू युनिक फाउंडेशन संस्थेतर्फे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळेस पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहराचे अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे तथा उपजिल्हाधिकारी पुणे, सचिन ढोले साहेब, प्रशांत खताळ व नागनाथ भोसले देखील उपस्थित होते. तसेच न्यू युनिक फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष मुज्जम्मील शेख, पुणे जिल्हा उपाध्यक्ष फरहान शेख, जावेद शेख व आदी उपस्थित होते. 
न्यू युनिक फाउंडेशन (New Unique Foundation) तर्फे दरवर्षी गौरव समारंभ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. तसेच यावर्षी देखील न्यू युनिक फाउंडेशनच्या माध्यमातून "गौरव समारंभ 2021" या कार्यक्रमामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
कोण आहेत दिनेश तावरे ?
दिनेश तावरे हे निगडी येथे "परिमंडळ अधिकारी" म्हणून ते काम करीत आहे. राज्यात त्यांच्या कार्याचा बोलबाला आहे. त्यांनी कोल्हापूर मध्ये आलेल्या पूरग्रस्तांसाठी केलेली मदत हे आजवर देखील जनतेच्या मनात आहे. त्यांनी पूर परिस्थितीत स्वतः आपल्या खांद्यावर धान्यांचे पोते घेऊन वाहनात भरले होते. तसेच कोरोना च्या काळात पिंपरी चिंचवड शहरातील १४ मोठ्या हॉस्पिटल वर कोरोना पेशंटसाठी समन्वय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले तसेच रेमडीसीवर इंजेक्शन कोरोना च्या काळात मोठा तुटवडा झाला, त्यावेळेस मा. जिल्हाधिकारी पुणे, सो यांनी तपासणी पथकामध्ये श्री. तावरे यांची नेमणूक करण्यात आली होती. तसेच कोरोना लॉकडाऊन च्या काळात पिंपरी चिंचवड शहरातील शिधापत्रिका धारक यांना धान्य वाटपामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.
अश्या प्रकारे त्यांचे अनेक कार्य समाजासाठी एक वेगळा विचार असल्याचे दिसून येथे. तसेच त्यांच्या कार्यालयाला आयएसओ मानांकन करिता परिमंडळ कार्यालय निगडी चे कामकाज एकच नंबर आहे. 

या सन्मानाबद्दल काय बोलले तावरे ?
तसेच तावरे यांना या सन्माना बाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर कमी वेळेत जास्तीत जास्त सेवा नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. संस्था संघटनांनी केलेला गौरव हा माझ्या एकट्याचा नव्हे तर माझ्या संपूर्ण अधिकारी सहकारी व कर्मचाऱ्यांचा आहे. या गौरवाने आणखीन काम करण्याची ऊर्जा मिळते. तसेच वारंवार आम्हाला मा.डॉ. श्री. त्रिगून कुलकर्णी साहेब उपायुक्त पुरवठा पुणे, विभाग पुणे व मा.अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे श्री.सचिन ढोले साहेब यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचे तावरे यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages