सांगली जिल्ह्यातील लाल शाहबाज कलंदर दर्गामध्ये विविध कामांचे लोकार्पण ; टाईम्स ऑफ महाराष्ट्र इफेक्ट - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Sunday, 5 June 2022

सांगली जिल्ह्यातील लाल शाहबाज कलंदर दर्गामध्ये विविध कामांचे लोकार्पण ; टाईम्स ऑफ महाराष्ट्र इफेक्ट

सांगली जिल्ह्यातील लाल शाहबाज कलंदर दर्गामध्ये विविध कामांचे लोकार्पण ; टाईम्स ऑफ महाराष्ट्र इफेक्ट
सांगली :- हजरत लाल शाहबाज कलंदर दर्गा धावडवाडी आटपाडी सांगली येथील ऐतिहासिक दर्गा ची अवस्था दुर्मिळ स्वरुपात होती त्यानंतर मागच्या वर्षी टाईम्स ऑफ महाराष्ट्राने दाखवलेल्या बातमीनंतर दर्गा आवारामध्ये भाविकांच्या व स्थानिक नागरिकांनी त्याची जबाबदारी घेऊन, दर्ग्याच्या आवारामध्ये रंगरंगोटीचे काम, फरशी बसवण्याचे काम, रस्त्याचे काम, झाडांचे सुशोभीकरण इत्यादी कामे करण्यात आले. तसेच 4 जून रोजी इस्माईल अब्बास शेख यांनी दर्ग्यात येणाऱ्या भाविकांसाठी स्वखर्चातून पाण्याची सोय म्हणजेच हप्सा (हॅन्डपम्प) बसवून दिले.
तसेच स्थानिकांनी टाईम्स ऑफ महाराष्ट्रचे व उपसंपादक सोहेल शेख यांचे आभार व्यक्त केले आहे.
त्यावेळीस कादर शेख,अली शेख, नासिर शेख, निसार शेख, आयूब शेख, उस्मान शेख, अहमद शेख, गणी शेख,भीकू वजीर शेख, आदम शेख, मोहम्मद हनीफ शेख, राजू मोहम्मद हनीफ शेख, बासु शेख व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages