खडक वाहतूक पोलिस अधिकारी व अमलदार यांची उत्कृष्ठ कामगिरी कामगाराचे हरवलेले 8000 हजार रकमेचे पाकीट केले परत... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Tuesday, 30 August 2022

खडक वाहतूक पोलिस अधिकारी व अमलदार यांची उत्कृष्ठ कामगिरी कामगाराचे हरवलेले 8000 हजार रकमेचे पाकीट केले परत...

खडक वाहतूक पोलिस अधिकारी व अमलदार यांची उत्कृष्ठ कामगिरी कामगाराचे हरवलेले 8000 हजार रकमेचे पाकीट केले परत...

पुणे :- खडक वाहतूक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी वाहतूक नियमनाचे कर्तव्य करत असताना दुपारच्या सुमारास गोटिराम भैया चौक मंडई चौका मध्ये ऐक काळ्या रंगाचे पाकीट रस्त्यावर पडलेले पोलीस उप निरीक्षक पवार व पोलीस अमलदार स्वप्नील कदम यांना दिसले. पाकीट उघडून पाहिले असता त्या पाकीटा मध्ये 8 हजार रुपये होते. त्या वेळी चौका मध्ये असलेल्या लोकांना सदर पाकीट कोणाचे आहे.
असे विचारले असता, पाकीटा बाबत कोणीच काही माहिती सांगितली नाही. त्यानंतर पाकीट मध्ये एक फोटो मिळाला त्या फोटोच्या आधारे पाकीट मालकाचा शोध घेतला तेव्हा त्या पाकीट बाबत खात्री करून संबंधित व्यक्तीला त्याचे पाकीट व त्यातील आठ हजार रु रोख रक्कम परत केली. पाकीट व रक्कम परत मिळाल्या मुळे कामगार खांबे यांनी खडक वाहतूक पोलिसांचे आभार मानले.
तसेच खडक वाहतूक ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनी सरवदे यांनी उपनिरीक्षक पवार व अंमलदार कदम यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages