दौंड तालुक्यातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अविनाश तिखे यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Wednesday, 17 August 2022

दौंड तालुक्यातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अविनाश तिखे यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार...

दौंड तालुक्यातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अविनाश तिखे यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार...
पुणे :- पंचायत समिती दौंड येथे मागील दोन वर्षात विशेष करून कोरोना काळात परप्रांतीय व ऊसतोड मजूर, स्थलांतरीत नागरीकांना मोफत अन्न धान्य वाटप, वैद्यकीय सुविधा पुरविणे व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे यांचेकडील सर्व योजना प्रभावीपणे राबविणे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडील प्रोसेस मॅपिंग व अभिलेख वर्गीकरणची अंमलबजावणी प्रभावीपणे केली तसेच, प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी मोलाचे योगदान दिल्यामुळे दौंड तालुक्यातील अविनाश तिखे कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंचायत समिती दौंड
व माणिक काटे वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती दौंड यांना सन 2020-21 करीता गुणवंत अधिकारी जिल्हास्तरीय पुरस्कार पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या शुभहस्ते 15 ऑगस्ट 2022 रोजी प्रदान करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages