टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने भिवरी येथे विधी सहाय्य शिबिराचे आयोजन... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Friday, 30 September 2022

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने भिवरी येथे विधी सहाय्य शिबिराचे आयोजन...

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने भिवरी येथे विधी सहाय्य शिबिराचे आयोजन...
पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक विधी महाविद्यालयातर्फे एक दिवसीय मोफत विधी सहाय्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुण्याजवळील असलेले भिवरी गावात यशस्वीपणे हे शिबीर पार पडले.
ह्या शिबिरात विधी महाविद्यालयातील ५ प्राध्यापक आणि एकूण ६४ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. जनतेमध्ये विधी विषयाबाबत आणि स्वतःच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून विधार्थ्यांकडून पथनाट्यही सादर करण्यात आले. महाविद्यालयातर्फे प्रश्नावलीचे वाटप करून, लोकांच्या कायदेविषयक ज्ञानाचे सर्वेक्षण करण्यात आले. सोबतच गावकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या अनेक विधी विषयक शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न हि केला गेला. भिवरी गावचे सरपंच दिलीप कटके यांच्याकडून ह्या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. सोबतच अश्या उपक्रमांना प्रत्येक गावात प्रोत्साहन दिले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला. ह्या विधी सहाय्य्य शिबिराचे समन्वयक सहाय्यक प्राध्यापक विद्या शेट्टी आणि सहाय्यक प्राध्यापक सीमा पाटील ह्यांनी सुद्धा अश्या पद्धतीने ग्रामीण भागात कायदेविषयक ज्ञानाचा प्रसार करत राहू असे आश्वासन दिले. तसेच प्रा. आश्विनी बिरादार प्रा. ऋचा शिंदे प्रा.सिध्दा कुलकर्णी यांनी विविध विषयांवर कायदेशीर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सरपंच दिलीप कटके यांनी केले. यावेळी सखाराम कटके, गुलाब दुसरे, बाळासाहेब कटके, बाबाजी घिसरे, नवनाथ कटके, सचिन दळवी, भाऊसाहेब दळवी, हरिदास गायकवाड ,विजय कटके, शंकर गोगावले, मार्तंड दळवी, शहाजी लोणकर, जगन्नाथ दळवी, संतोष लोणकर, किरण कटके, सिताराम कटके हे उपस्थित होते व सूत्रसंचालन मोहिनी लोणकर, विद्यार्थी संघटक सागर बारगीर, रणजित परदेशी यांनी केले तसेच आभार संदीप सारडा यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages