पुण्यातील दोन युवकांनी केला चक्क सायकली वरून चंदन नगर ते गेट ऑफ इंडिया असा बारा तासांचा प्रवास... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Sunday, 4 September 2022

पुण्यातील दोन युवकांनी केला चक्क सायकली वरून चंदन नगर ते गेट ऑफ इंडिया असा बारा तासांचा प्रवास...

पुण्यातील दोन युवकांनी केला चक्क सायकली वरून चंदन नगर ते गेट ऑफ इंडिया असा बारा तासांचा प्रवास...

पुणे :- चंदन नगर येथे राहणाऱ्या दीपक राम वय वर्षे 29 व कुलदीप कुमार वय वर्षे 30 या दोन युवकांनी चंदन नगर ते मुंबई मारिन डड्राईव्ह असा 167km प्रवास सायकली वरून केला.

प्रवासाची सुरवात 2 तारखेला शुक्रवारी रात्री 2 वाजता चंदन नगर येथून केली असून चंदन नगर ते भक्ती शक्ती निगडी, कामशेत, लोणावळा, खंडाळा, पनवेल, ठाणे, दादर, मार्गे सकाळी 2 वाजता मारिन ड्राईव्ह गेट ऑफ इंडिया ला पोहचले  तरी या दोन्ही युवकांचे पुण्यातील उद्योजक जनता डेव्हलपर्स चे मालक गणेश खुडे यांनी कौतुक केले असून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांचा सन्मान सुद्धा केला आहे.

त्यावेळेस बोलताना खुडे यांनी युवकांनी आपल्या स्वस्थ आरोग्या साठी जास्तीत जास्त व्यायाम आणि सायकलिंग ला महत्व दिले पाहिजे व पर्यावरण रक्षण केले पाहिजे असा सामाजिक संदेश सुद्धा दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages