पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड स्वच्छतेच्या बाबतीत अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Wednesday, 7 September 2022

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड स्वच्छतेच्या बाबतीत अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष...

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड स्वच्छतेच्या बाबतीत अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष...

पुणे :- सध्या अनेक वायरल आजारांमुळे लोकं त्रस्त असल्याचे चित्र सर्व ठिकाणाहून दिसत आहेत त्यामध्येच पुण्यातील कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत असलेले कॅम्प परिसर अतिशय खराब अवस्थेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. कॅम्प मधील कुंभार बावडी मंडई मध्ये अनेक बेवारस जनावरांचे वावर आहे व हा परिसर अतिशय दुर्दैवी अवस्था झाल्याचे चित्र दिसत आहेत. या परिसरामध्ये जवळपास दोन ते अडीच हजार लोक राहतात तसेच त्या ठिकाणी मंडई देखील आहे. त्या मंडईमध्ये दररोज अनेक नागरिक भाजीपाला खरेदी करण्याकरिता येत असतात. आणि अश्यातच प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसत आहे. अनेकदा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा काही वेळ लक्ष देऊन नंतर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहेत.
याबाबत काही दिवसांपूर्वी काही पत्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या विषयासंदर्भात भेटायला गेले असता त्यांच्या कार्यालयातील अधिकारी यांनी जवळपास एक तास पत्रकारांना बसून ठेवण्यात आले. आणि भेट देखील झाली नाही. काहीही कारण देऊन कानाडोळा करत असल्याचे कळाले आहे. आता याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आरोग्य अधिकारी केव्हा लक्ष घालतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages