पुणे शहरात दुकानांचे शटर उचकाटुन चो-या करणाऱ्या टोळीस चंदननगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Wednesday, 7 September 2022

पुणे शहरात दुकानांचे शटर उचकाटुन चो-या करणाऱ्या टोळीस चंदननगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या...

पुणे शहरात दुकानांचे शटर उचकाटुन चो-या करणाऱ्या टोळीस चंदननगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या...
पुणे :- 31 ऑगस्ट रोजी रात्री चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड व नामदेव गडदरे असे चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत खाजगी चारचाकी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना रात्री 03/00 वा.चे सुमारास पोलीस अंमलदार नामदेव गडदरे, व सुभाष आव्हाड यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिऴाली की, एक निऴ्या रंगाच्या मारुती कंपनीच्या झेन गाडीमध्ये चार ते पाच संशयीत इसम चंदननगर परीसरामध्ये फिरत असुन त्यांच्याकडे हत्यार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिऴाल्याने त्यांनी बातमी बाबत माहीती रात्रगस्त अधिकारी सपोनि सोनवणे यांना कळवुन त्यांनी वपोनि व पोनि गुन्हे चंदननगर पोलीस स्टेशन पुणे यांना कऴवुन त्यांनी बातमी प्रमाणे खात्री करुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिल्याने सपोनि
सोनवणे, हे स्टाफ सह गाडीचा शोघ घेणे करीता रवाना होवुन बातमीतील वर्णनाप्रमाणे निऴया रंगाची चारचाकी मारुती कंपनीची झेन गाडी छत्रपती शिवाजी महाराज पुतऴ्या कडुन संघर्ष चौकाकडे येताना दिसल्याने सदर चारचाकी गाडीस पोलीसांनी थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी गाडीसह पळ काढला त्यावेळी पोलीसांनी त्यांचा पाठलाग करून गाडी थांबवुन पोलीस अंमलदार आव्हाड व गडदरे यांनी झडप घालुन शिताफीने 4 इसमांना ताब्यात घेतले. त्यंाचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी एटीएम वर दरोडा टाकण्यासाठी आलो असल्याची कबुली दिल्याने त्यांना पोलीस स्टेशनला आणुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी 1) गणेश दगडु शिंदे वय 30 वर्षे धंदा बिगारी रा.स्मशानभुमी जवऴ, काऴेवाडी, पिंपरी चिंचवड 2) यश सर्जेराव खवऴे वय 19 वर्षे रा. पिंपरी स्टेशनचे बाजुला, आदर्श हॉटेलचे बाजुला,भारतनगर, पिंपरी,पुणे तसेच विधीसंघर्षग्रस्त बालक 
3) तौफिक चांद शेख वय 17 वर्षे रा. वाघेरे कॉलनी नं. 3, पिंपरी चिंचवड, पुणे 4) यश दत्ता देशमुख वय 17 
वर्षे रा. सौदागर कॉलनी, ग.नं. 4, पिंपरी असे असल्याचे सांगुन त्यांच्या विरोधात चंदननगर पो.स्टे गु.र.नं 
314/2022, भादवि कलम 399, 402, आर्म अॅक्ट कलम 4 (25), 4(25), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) (3) सह 135 अन्वये गुन्हा नोंद करून अधिक तपास करून त्यांचेकडुन चंदननगर पोलीस स्टेशन कडील 04 गुन्हे, समर्थ पोलीस स्टेशन कडील 02 गुन्हे, विमानतळ पोलीस स्टेशन कडील 01 गुन्हा, लोणीकंद पोलीस स्टेशन कडील 01 गुन्हा असे एकुण 08 घरफोडीचे व वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले असुन त्यांच्याकडुन 01 चारचाकी गाडी, 2 दुचाकी गाड्या, लोखंडी कोयता, लोखंडी कटावणी, लोखंडी कटर, 2 मोबाईल फोन, एक एक्साईड कंपनीची बॅटरी, सिगारेटची पाकिटे, चप्पल जोड, मिरचीच्या पुड, नायलॉन दोर असा एकुण 2,15,390/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत के ला आहे. सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, पोलीस उपआयुक्त परीमंडळ 4 पुणे शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर, चंदननगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सुनिल जाधव , पोलीस निरीक्षक (गुन्हे) रविंद्र कदम, यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई सपोनि मनोहर सोनवणे, सपोनि संभाजी गोलांडे, पोलीस अंमलदार- सुहास निगडे, नितीन लवटे, महेश नाणेकर, प्रदिप धुमाळ, श्रीकांत शेडे, शिवाजी धांडे, सुभाष आव्हाड, नामदेव गडदरे, विकास कदम, राहुल बडेकर, सचिन चव्हान, श्रीकांत कोद्रे, शेखर शिंदे, शिवाजी निर्मळ यांचे पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages