अरे बाप...रे... पुण्यातील विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट ;13 मटके आणि 6 पत्त्यांचे क्लब सुरू...पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे झाले उल्लंघन... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Thursday, 13 October 2022

अरे बाप...रे... पुण्यातील विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट ;13 मटके आणि 6 पत्त्यांचे क्लब सुरू...पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे झाले उल्लंघन...

अरे बाप...रे... पुण्यातील विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट ;13 मटके आणि 6 पत्त्यांचे क्लब सुरू...पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे झाले उल्लंघन...


पुणे :- शहरात पुणे पोलीस आयुक्तांचे अवैध धंद्यांना चपराक असताना तसेच अवैध धंद्यांबद्दल कडक कारवाईचे आदेश असताना पुणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणारे विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट पहायला मिळत आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 मटक्यांचे धंदे, अवैध दारू विक्रेते तर 6 पत्त्यांचे क्लब सुरू आहेत. याव्यतिरिक्त अनेक अवैध धंद्यांचा धुमाकूळ असल्याचे देखील सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

लवकरच अवैधधंदे चालकांचे नावे करणार जाहीर...
या अवैध धंदा करणारे चालकांचे देखील नाव आमच्या कडे उपलब्ध असून, त्यांची नावे आम्ही पुढील भागामध्ये लवकरच स्पष्ट करणार आहोत. 

पोलिसांकडून नागरिकांची दिशाभूल ?
मागील काळात पोलिसांना या धंद्यांबद्दल त्या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांनी तक्रार देखील केलेली आहे. त्या वेळी  काही काळ धंदे बंद करून नागरिकांची  त्यांची दिशाभुल करून परत चालु झाल्याचा प्रकार पहायला मिळाले आहे.
त्या ठिकाणी राहत असलेल्या महिला, युवक व विद्यार्थी हे त्रस्त झाले आहेत.
समाजासाठी हे अवैध धंदे खूप घातक असून, त्यामुळे होणारे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात आहेत.

पुढील भाग क्रमांक 2 मध्ये अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे नावे करणार जाहीर...
हे धंदे कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत या अधिकारी व कर्मचारी यांची यादी आम्ही लवकरच दुसऱ्या भागात स्पष्ट करणार आहोत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages