पुण्यातील कॅम्पमध्ये असलेली मुन्शीयान मस्जिदीत पैगंबर मोहम्मद यांच्या केसांचे अनुयायांना दर्शन... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Tuesday, 4 October 2022

पुण्यातील कॅम्पमध्ये असलेली मुन्शीयान मस्जिदीत पैगंबर मोहम्मद यांच्या केसांचे अनुयायांना दर्शन...

पुण्यातील कॅम्पमध्ये असलेली मुन्शीयान मस्जिदीत पैगंबर मोहम्मद यांच्या केसांचे अनुयायांना दर्शन...

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), कॅम्पमध्ये असलेली मुन्शीयान मस्जिद मध्ये पैगंबर मुहम्मद सल्ललाहू अलयहि व सल्लम यांच्या केसांचे नागरिकांना जियारत (दर्शन) देण्यात आले. सलग 12 दिवस हा कार्यक्रम सायंकाळी मगरीबच्या नमाज नंतर चालत असतो. 10 वर्षांपूर्वी या केसांना सौदी अरेबियात असलेले मुस्लिम समाजाचे महत्त्वाचे ठिकाण मानले जाणारे मक्का या शहरातून पुण्यात आणले गेले होते. सलग 10 वर्षांपासून आज तागायत दरवर्षी अरबी केलेंडर प्रमाणे तिसरा महिना 1 राबिउल अव्वल ते 12 राबिउल अव्वल पैगंबर मुहम्मद यांच्या जन्मदिवस ईद-ए-मिलादुन्नबी पर्यंत ह्या केसांचे अनुयायांना दर्शन देण्याचा कार्यक्रम पार पाडतो.
या कार्यक्रमाला असंख्य अनुयायी उपस्थिती दर्शवतात पुण्यातून व पुण्याच्या आजूबाजू असलेले जिल्ह्यातून सुद्धा अनुयायी हे पाहण्याकरिता येतात. तसेच या केसांना ज्यावेळेस आणले होते त्यावेळेस ह्या केसांची संख्या फक्त 2 होती. आणि आज ह्या केसांची संख्या 6 एवढी झाली आहे. हा खूप मोठ्ठा चमत्कार पाहण्यात आलेला आहे. तसेच या केसांचे पडताळणी केलेले प्रमाणपत्र देखील मस्जिदी कडे उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages