काँग्रेस अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी म्हणजेच 19 ऑक्टोबरला पार पडली. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. मतमोजणीचा निकाल दुपारी 4 पर्यंत जाहीर करण्यात येईल असं सांगितलं जात होतं मात्र हा निकाल दुपारी दीडच्या सुमारासच स्पष्ट झाला. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर शशी थरुर यांच्या गटाचे सलमान सोज यांनी निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला. सोज यांनी केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या मतदानात गडबड झाल्याचा सोज यांनी आरोप केला होता आणि उत्तर प्रदेशातील सर्व मते अवैध ठरवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती.

No comments:
Post a Comment