भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयातील उप अभियंताचा प्रताप नागरिकांचे मोबाईल नंबर थेट ब्लॅक लिस्टला; आयुक्तांकडे कारवाईची मागणी - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Tuesday, 8 November 2022

भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयातील उप अभियंताचा प्रताप नागरिकांचे मोबाईल नंबर थेट ब्लॅक लिस्टला; आयुक्तांकडे कारवाईची मागणी

भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयातील उप अभियंताचा प्रताप नागरिकांचे मोबाईल नंबर थेट ब्लॅक लिस्टला; आयुक्तांकडे कारवाईची मागणी

क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे फोन उचलत नसल्याने तेही वैतागलेत? 

पुणे :- भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयात मनमानी कारभार सुरू असून कोणालाही नागरिकांच्या अडी अडचणीचे घेण देणे नाही. नागरिकांच्या तक्रारी मांडणा-या समाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनाच थेट ब्लॅक लिस्टला टाकलं जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील उप अभियंता प्रविण शिंदे ह्यांना कोणी फोन लावू नये यासाठी मोबाईल नंबर ब्लॅक लिस्टला टाकून अकलेचे तारे तोडले आहे. शिंदे यांच्यावर वरिष्ठांची दशहत नसल्याने शिंदे यांचा मनमानी कारभार पाहिला मिळत आहे. असे उद्योग करून शिंदे हे असक्षम असल्याचे त्यांनी या कृतीतून दिसून आले आहे. प्रविण शिंदे यांची मुजोरी सावरकर भवन बांधकाम विकास विभाग येथेही पाहिला मिळाली होती. नागरिकांचे मोबाईल नंबर ब्लॅक लिस्टला टाकणा-या उप अभियंता प्रविण शिंदेवर कारवाईची मागणी पुणे महानगर पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. 

" माहिती अधिकार कायदाही बसविला जातो धाब्यावर "

माहिती अधिकारात मागितलेली माहिती न देण्याचाच पायदंडा भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील जनमाहिती अधिकारी व प्रथम अपील अधिका-यांनी घातला आहे. माहिती अधिकारातील माहिती न दिल्याने एका समाजिक कार्यकर्ताने पुणे महानगर पालिका मुख्य इमारती समोर आंदोलन केल्याने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात बोलवून माहिती देण्याची नामुष्की ओढवली आहे. खरंतर हे सगळं प्रकार प्रविण शिंदे आल्या पासून जास्त प्रमाणात वाढले आहे. शिंदे हे अपील अधिकारी असताना  अपिलाच्या वेळी अपिलार्थींना उलट सूलट प्रश्न विचारून जनमाहिती अधिका-यांना पाठीशी घालण्याचा प्रकार शिंदेकडून केला जात आहे. याबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages