पुण्यातील मुन्शीयान मस्जिद ट्रस्टच्या वतीने सिल्वर इन हॉटेल परमिट रूम बार बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना दिले निवेदन... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Wednesday, 11 January 2023

पुण्यातील मुन्शीयान मस्जिद ट्रस्टच्या वतीने सिल्वर इन हॉटेल परमिट रूम बार बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना दिले निवेदन...

मुन्शीयान मस्जिद ट्रस्टच्या वतीने सिल्वर इन हॉटेल परमिट रूम बार बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना दिले निवेदन...

पुणे :- पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये असलेले सिल्वर इन हॉटेल परमिट रूम बार बंद करण्यासाठी मुन्शीयान मस्जिद ट्रस्टच्या वतीने ट्रस्टी निसार खान आणि सलीम मौला पटेल यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे धार्मिक स्थळ शाळा कॉलेज प्रार्थनास्थळे यापासून 75 मीटरचे अंतरा बाहेर परमिट रूम अगर दारूची विक्री करण्याची मुभा आहे आणि असे असताना मुन्शियान मस्जिद ही केवळ दहा मीटर अंतरावर सदरील परमिट रूम दारू विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे तसेच सदर सिल्वर इन हॉटेल पासून जवळच्या अंतरावर चर्च देखील आहे शाळा आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाची अवहेलना होत आहे आणि सर्वोच्च न्यायालया चे आदेशाचे पालन होणे न्यायाच्या दृष्टीने गरजेचे आहे. तसेच सदर सिल्वर इन हॉटेलमध्ये सतत दारू पिण्यासाठी लोक येतात आणि त्यामुळे मस्जिद मध्ये होत असलेल्या प्रार्थनेला नमाजला आरडाओरडा व गोंधळ यामुळे व्यत्यय व अडथळे येत आहेत. आणि तसेच सदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये देखील नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे. सदर परिसरामध्ये चालू असलेल्या दारू विक्री परमिट बार रूम मुळे शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची व शांतता भंग होण्याची शक्यता आहे. तसेच मुन्शीयान मस्जिद ट्रस्ट तर्फे ट्रस्टी निसार खान आणि सलीम मौला पटेल यांनी सिल्वर इन हॉटेल यांच्या मालकाविरुद्ध रीतसर फिर्याद नोंदवावी आणि यांचे लायसन्स रद्द करावे अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages