अवैधरित्या कोयते बाळगणाऱ्या दोन गुन्हेगारांच्या मार्केटयार्ड पोलीसांनी आवळल्या मुसक्या... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Thursday, 2 February 2023

अवैधरित्या कोयते बाळगणाऱ्या दोन गुन्हेगारांच्या मार्केटयार्ड पोलीसांनी आवळल्या मुसक्या...

अवैधरित्या कोयते बाळगणाऱ्या दोन गुन्हेगारांच्या मार्केटयार्ड पोलीसांनी आवळल्या मुसक्या...

पुणे :- मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन इसम अवैधपणे कोयते बाळगत असल्याची माहिती मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे पोउपनि शिंदे यांना मिळाल्याने मार्केटयार्ड आंबेडकरनगर रिक्षा स्टॅन्ड येथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले असता त्याचेकडे १८ कोयते व एक रिक्षा मिळून आली त्या अनुशंगाने मार्केटयार्ड पो.ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

त्याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. ०१/०२/२०२३ रोजी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याकडील एटीसीचे पोउपनि शिंदे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे हद्दीत आंबेडकरनगर रिक्षा स्टॅन्ड येथे दोन इसम रिक्षा क्र. एमएच १२ आरपी ७७५० हिचेमध्ये अवैध्यरित्या कोयते विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्याच्या हातुन कोणतातरी गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आहे. अशी बातमी मिळाल्याने पोउनि युवराज शिंदे यांनी सदरची बातमी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.व्ही. देशपांडे व पोलीस निरीक्षक, गुन्हे सविता ढमढेरे यांना सांगितली असता, त्यांनी तपास पथकाचे अधिकारी सपोनि कांबळे व कर्मचाऱ्यांना कारवाई बाबत सुचना देऊन सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेण्यास सांगितले.

वरीष्ठांकडून मिळालेल्या सुचनांप्रमाणे सपोनि कांबळे, पोउपनि शिंदे यांनी तपास पथकाचे पोहवा हिरवळे, पोना ७५५४ जाधव, पोना ६९९६ जाधव, पोना ७७४० मोधे, पोअं २३९२ यादव पोअं ८५५३ सुर्यवंशी, पोअं ८२३५ गायकवाड, पोअं १०६७२ दिवटे यांचेसह मार्केटयार्ड आंबेडकरनगर रिक्षा स्टॅन्ड जवळ सापळा रचून बातमीदाराकडून अधिक माहिती काढून सदर दोन्ही इसमांना रिक्षासह आंबेडकरनगर गल्ली नं१ च्या आलीकडे रिक्षा स्टॅन्डच्या मागे पंचासमक्ष ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव- १) भवरसिंग भुरसिंग भादा, वय ३५ वर्षे, रा. स.नं. १०, गणेश नगर येरवडा पुणे २) गणेशसिंग हुमनसिंग टाक, वय ३२ वर्षे, रा. स.नं. १०, बालाजीनगर येरवडा पुणे असे असल्याचे सांगितल्याने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपी नामे गणेशसिंग टाक याचे कमरेला एक लोखंडी कोयता व आरोपी भवरसिंग भादा याचे रिक्षाची बारकाईने पंचासमक्ष पाहणी करता त्यामध्ये मागील सिटचे मागे पिशवीमध्ये १७ कोयते असे एकुण १८ कोयते व एक रिक्षा असा एकुण ५५,४००/- रुपये किंमतीचा माल त्याचे ताब्यात मध्ये मिळून आला. त्यावेळी त्यांचेकडे मिळुन आलेले कोयते जवळ बाळगण्याचे कारण सपोनि कांबळे यांनी विचारता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यावेळी सपोनि कांबळे यांनी सदरचे १८ कोयते सुरक्षीत रित्या पंचासमक्ष ताब्यात घेतले त्याच्या विरुद्ध मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ४०/२०२३ आर्म अॅक्ट कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल कर त्याचा पुढील तपास अनिल शिंदे, पोहवा ८८३. मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कारवाई पुर्व प्रादेशिक विभाग चे अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, परिमंडळ ५ चे पोलीस उप-आयुक्त विक्रांत देशमुख, वानवडी विभागाचे सहा. पोलीस आयुक्त पोर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. व्ही. देशपांडे, पोलीस निरीक्षक गुन्हे सविता ढमढेरे यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सपोनि कांबळे, पोउपनि शिंदे, यांनी तपास पथकाचे पोहवा हिरवळे, पोना ७५५४ जाधव, पोना ६९९६ जाधव, पोना ७७४० मोधे, पोअं २३९२ यादव पोअं ८५५३ सुर्यवंशी, पोअं ८२३५ गायकवाड, पोअं १०६७२ दिवटे यांच्या पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages