पुण्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डात घडला विचित्र प्रकार ;कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी देतायेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिव्या; सफाई वाला कर्मचारी असून करतोय संगणक कक्षाचे काम... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Wednesday, 15 February 2023

पुण्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डात घडला विचित्र प्रकार ;कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी देतायेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिव्या; सफाई वाला कर्मचारी असून करतोय संगणक कक्षाचे काम...

पुण्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डात घडला विचित्र प्रकार...
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी देतायेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिव्या ; अतिक्रमण विभागाने केलेल्या साहित्यांची होतीये चोरी...
कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्यावर सफाईवाला राहुल चौधरी ; अधिकाऱ्यांना देतोय चुकीची माहिती...
राहुल चौधरी सफाई वाला कर्मचारी असून करतोय संगणक कक्षाचे काम...
पुणे :- पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये दिनांक 13 तारखेला सोमवारी चार वाजल्याच्या सुमारास एक साफसफाई वाला कर्मचारी अतिक्रमण विभागांमध्ये असलेल्या साहित्यांकडे गेला तेथे असलेले अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईमध्ये मिळालेले सामान त्यामध्ये काही जॅकेट्स होते तो एक एक करून त्या ठिकाणी पाहत होता आणि स्वतः घालून पाहणी करत होता हे चालू असताना त्या ठिकाणी राहुल चौधरी हा व्यक्ती भंडारामध्ये गेला आणि त्याला सांग त्यांनी सांगितले की '' उपर से तेरा बाप देख रहा है". समोरच्या परदेशी नामक कर्मचाऱ्यांनी चौधरी याला सांगितले की " वो बाप की मा की ***** असे सांगितले हा प्रकार सर्व आमच्या प्रतिनिधीच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाला.


हे प्रकार घडल्यानंतर आमच्या प्रतिनिधीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब घातली असता अधिकाऱ्याने चौधरी याला नाव विचारले असता परदेशी नामक कर्मचाऱ्याचे नाव त्यांनी चुकीचे सांगून अधिकाऱ्याची दिशाभूल केली तसेच कदाचित अधिकारी देखील या गोष्टीला टाळा टाळ करत असतील असे प्रकार पाहायला मिळाले.

कोण आहे हा राहुल चौधरी आणि का करतोय काही कर्मचाऱ्यांची पाठराखण आणि काही कर्मचाऱ्यांना का देतोय त्रास ?
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये मागील काळात कंत्राट पद्धतीवर साफसफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेला राहुल चौधरी आज पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापेक्षाही वरिष्ठ पदावर असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांवर अरेरावी करणे दमदाटी करणे असे प्रकार करत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून कळाले आहे.

सफाई काम करणारा कर्मचारी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात चालवतोय संगणक...
सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की, राहुल चौधरी हा व्यक्ती कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये कंत्राट पद्धतीने झाडूवाला म्हणून काम करत होता. त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन आरोग्य विभागात संगणक चालवता येत असल्याचे सांगून आपल्या कार्यालयामध्ये कामाला घ्या अशी विनवणी केली सध्या तो कॅन्टोन्मेंट बोर्डात आरोग्य विभागामध्ये संगणक चालवणारा कर्मचारी म्हणून काम पाहत आहे. परंतु त्याचे पद हे सफाईवाला आहे. ते करत असताना सुरक्षारक्षक आरोग्य विभागातील कर्मचारी अतिक्रमण विभागातील कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना दमदाटी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. कर्मचारी असे सुद्धा सांगतात की आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्य अधिकारी हे सुद्धा आम्हाला अशा प्रकारे वागणूक देत नाहीत परंतु हा राहुल चौधरी आम्हाला खूप त्रास देण्याचा काम करतो.
नेमकं कोण आहे या राहुल चौधरी च्या मागे असा आम्हाला नेमका सवाल उपस्थित झाला आहे. 
या विचित्र प्रकारावर अधिकारी या दोन्ही कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करणार असे प्रश्न उपस्थित झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages