मुंढवा परीसरात मोठया आवाजात साऊंड सिस्टीम लावुन संगीत वाजवणारे बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट अँड बारवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून साऊंड सिस्टीम, डि.जे. मिक्सर केला जप्त ; परंतु मुंढवा पोलीस ठाण्याचे असल्या अनेक प्रकरणांवर सर्रासपणे दुर्लक्ष... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Tuesday, 28 February 2023

मुंढवा परीसरात मोठया आवाजात साऊंड सिस्टीम लावुन संगीत वाजवणारे बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट अँड बारवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून साऊंड सिस्टीम, डि.जे. मिक्सर केला जप्त ; परंतु मुंढवा पोलीस ठाण्याचे असल्या अनेक प्रकरणांवर सर्रासपणे दुर्लक्ष...

मुंढवा परीसरात मोठया आवाजात साऊंड सिस्टीम लावुन संगीत वाजवणारे बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट अँड बारवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून साऊंड सिस्टीम, डि.जे. मिक्सर केला जप्त ; परंतु मुंढवा पोलीस ठाण्याचे असल्या अनेक प्रकरणांवर सर्रासपणे दुर्लक्ष...

पुणे :- दि. २६.०१.२०२३ रोजी सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे मुंढवा परीसरात पेट्रोलिंग करीत असताना ताडीगुत्ता रोड, मुंढवा, पुणे येथे बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट अँड बार मध्ये मोठया आवाजात साऊंड सिस्टिमचा आवाज येत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले.

त्या अनुशंगाने सदर ठिकाणी खात्री केली असता बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट अँड बार, मुंढवा येथे मोठया आवाजात साऊंड सिस्टिमवर संगीत सुरू असल्याचे आढळल्याने, सदर हॉटेलवर कारवाई करून ०३,३०,०००/- रू किचे साऊंड सिस्टिम जप्त केली असुन, हॉटेलचे मालक व मॅनेजर विरूध्द पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन २०००) अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

सदर ठिकाणी ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करणेकामी जप्त मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) मुंढवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे.
परंतु यामध्ये प्रामुख्याने मुंढवा पोलीस स्टेशन सर्रास पणे अश्या अनेक रेस्टॉरंट आणि बार यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

सदरची कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार अजय राणे, संदीप कोळगे व अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages